Skip to main content

श्री गणपती जन्मकथा व माहिती

श्री गणेश, हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक आहेत. विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाणारे, ते बुद्धी, ज्ञान आणि नवीन सुरुवातीचे देवता आहेत. त्यांचे पूजन कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला केले जाते, कारण असे मानले जाते की ते सर्व अडचणी दूर करतात आणि यश मिळवून देतात.


परिवार माहिती :- श्रीगणपती देवता
वाहन: उंदीर
शस्त्र: पाश, अंकुश, परशु, दंत
वडील: देव  शंकर
आई: देवी  पार्वती
पत्नी:  देवी ऋद्धी, देवी सिद्धी
पुत्र: शुभ, लाभ
भाऊ: श्री कार्तिकेय
वहिनी: देवसेना देवी
बहिनः अशोकसुंदरी
सासरे: विश्वकर्मा
सासु: भुवना देवी


अन्य नावे/ नामांतरे

ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण


गणपतीची बारा नावे

१.वक्रतुंड

२. एकदंत

३.कृष्णपिंगाक्ष

४. गजवक्त्र

५.लंबोदर

६.विकट

७.विघ्नराजेंद्र

८.धूम्रवर्ण

९.भालचंद

१०.विनायक

११.गणपती

१२.गजानन


गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे.

नावे:-
पुराणांमध्ये गणपती हा शिवहर, पार्वतीपुत्र या नावांनी व शंकरपार्वतींचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. गणपतीला इतर काही नावे आहेत - माघ शुक्ल चतुर्थी व भाद्रपद शुक्ल चतुर्थी असा दोनदा जन्म झाल्याने द्वैमातुर नावानेही ही देवता ओळखली जाते. या देवतेस अग्रपूजेचा मान असतो. हिंदू धर्मग्रंथात या देवतेची वर्णने स्थलपरत्वे बदलत असली तरी हत्तीचे मुख आणि मनुष्याचे शरीर असलेली देवता हे वर्णन समान आहे. या देवतेचे वाहन काही ठिकाणी उंदीर तर काही ठिकाणी सिंह सांगितले आहे.पुराण व साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. गणपती हा महाभारत या ग्रंथाचा लेखनिक होता.

भारतात सर्वत्रच गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. गणेशाचा उपासक संप्रदाय गाणपत्य नावाने ओळखला जातो. हा संप्रदाय गणेशाची मयूरेश्वर नावाने पूजा करतो. गणेश गायत्री मंत्र असा आहे –
“ महत्काया विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ”


वक्रतुण्ड म्हणजे ज्याचे तुण्ड (तोंड) वक्र वा वाकडे आहे तो. गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव. एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. प्रथम कथेनुसार, परशुरामाने युद्धात गणपतीचा एक दात उपटला. दुसर्‍या कथेनुसार कैलास पर्वतावर गणपतीने रावणास अडवले म्हणून रावणाने गणपतीचा एक सुळा मोडला. आणखी एका कथेनुसार खेळाखेळातील लढाईत कार्तिकेयाने गणपतीचा एक दात भग्न केला. महोदर आणि लंबोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा व लंब वा लांबडे उदर (पोट) असणारा असा आहे. ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात. विघ्नराज वा विघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपति असा आहे. पुराणात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती म्हणून उल्लेख आढळतो. सकल बाधांचा अधिपति व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस हे नाम प्राप्त झाले.

गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो.  वैदिक गणपतीचा स्पष्टपणे निर्देश करतात. जरी हा वैदिक गणपती व सध्या पूजिला जाणारा पौराणिक गणपती एक नसला तरी वेदोत्तर काळात ऋग्वेदातील गणपती-ब्रह्मणस्पती-वाचस्पती पासूनच पौराणिक गजवदन-गणेश-विघ्नेश्वर हे रूप उद्भवल्याचे अनेक संशोधक मान्य करतात.


दुसर्‍या मतानुसार भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लम्बोदर यक्षाच्या एकत्रिकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली. गणेश या मूळच्या अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे हा दुसरा कयास लावण्यात येतो. गणेशाचे वाहन उंदिर याच आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहिले असावे. इसवीसनपूर्व आठव्या शतकापासून सहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत लिहिल्या गेलेल्या बौधायण धर्मसूत्रात गणेशाचा उल्लेख नाही. इसवीसनाच्या चौथ्या शतकातील कालिदास, इसवीसनाच्या सहाव्या शतकातील भारवी, इसवीसनाच्या पाचव्या शतकातील पंचतंत्र वा भरताच्या नाट्यशास्त्रातही गणेश देवता दिसत नाही. गुप्त काळाच्या अस्तकाळापासून या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असावी.


मानवगृह्यसूत्र व याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये शाल, कटंकट, उष्मित, कुष्माण्ड राजपुत्र व देवयजन इत्यादीचा विनायक म्हणून उल्लेख आहे. महाभारतातील विनायक हाच आहे. याचे काम विघ्न उत्पादन करणे असे. पुढे हाच विघ्नकर्ता गणपती विघ्नहर्ता मानला जाऊ लागला. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक हा अम्बिकेचा पुत्र होय. गणेशाचा पार्वतीपुत्र उल्लेख येथेच प्रथम होतो. अनेक पुराणे स्वयम्भू मानतात.कार्तिकेयाचे अनेक गण वा पार्षदही पशुपक्ष्यांचे मुखधारित असतात. इसवीसनाच्या सहाव्या शतकातील 'भूमारा'त याप्रकारच्या अनेक गणांचा उल्लेख सापडतो. गणेश म्हणजेच गण-ईशाचे ह्त्तीमुख असण्याचे हेही कारण असू शकते. काही ठिकाणी गणेश व यक्ष/नागदेवता यांची वर्णने मिसळल्याचे दिसते. गणपतीच्या ह्त्तीमुखाचे हेही कारण असावे. पुराणांमध्ये ह्त्तीमुखधारी यक्ष आहेत. यक्ष हे गणपती प्रमाणे लंबोदर असतात.


पौराणिक संदर्भ

गणेश पौराणिक हिंदू धर्मातील प्रथम पूज्य व त्या कारणाने एक मुख्य देवता आहे. म्हणून या देवतेचा नाना आख्यानां-उपाख्यानांत, वेगवेगळ्या पुराणांत व महाकाव्यांत उल्लेख येतो. गणेशाविषयीची सर्वाधिक महत्त्वाची कहाणी म्हणजे गणपतीचे गजानन होणे होय. प्रत्येक पुराणाच्या वर्ण्यविषयानुसार या प्रसंगावर विविध भाष्येही वाचायला मिळतात. इतकी की यामुळे पुराणांमध्ये काही ठिकाणी परस्पर-विरोधही दिसतो. याशिवाय गणपतीच्या मातृपितृभक्ती व विवाहाविषयीच्या अनेक कथा वाचायल्या मिळतात.


गणेश चतुर्थी


भाद्रपद व माघ महिन्याची शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणतात. हिंदूश्रद्धेनुसार हा गणपतीचा जन्म दिन होय. गणेश चतुर्थीची प्रचलित कथा येणेप्रमाणे आहे - एकदा गणपती चतुर्थीचे स्वतःचे आवडीचे मोदक खाऊन उंदराच्या पाठीवरून जात होता. वाटेत साप पाहिल्याने उंदिर भयाने कापू लागला. यामुळे गणपती उंदराच्या पाठीवरून खाली पडला व त्याचे पोट फाटून मोदक बाहेर पडले. गणपतीने ते सारे मोदक पुनः पोटात टाकले व पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला. म्हणून तुझे चतुर्थीस कोणी दर्शन करणार नाही असा शाप दिला.

अवतार


उपपुराण मानल्या जाणार्या व गाणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या गणेश पुराण व मुद्गल पुराण- ह्या दोन ग्रंथात गणपतीच्या अनुक्रमे चार व आठ अवतारांचा उल्लेख आहे.


गणेश पुराण – गणेश पुराणात- गणपतीचे चार अवतार अनुक्रमे सत्य, त्रेता, द्वापर व कलियुगात झाले असा उल्लेख आहे. हे होते -


महोत्कट विनायक – हा दशभूजाधारी व रक्तवर्णी अवतार. वाहन सिंह. कश्यप , .दिती यांच्या सन्तान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला. या अवतारात त्याने नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असुर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला.

मयूरेश्वर – हा षडभूज व श्वेतवर्णी अवतार आहे. वाहन मोर. त्रेता युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंधू नामक दैत्याच्या वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळेस मोर भाऊ कार्तिकेय यास दान केला. मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे


 गजानन – हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार. वाहन उंदिर. द्वापार युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंदूर नामक दैत्याच्या वध केला.अवतारसमाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य यास गणेश गीता सांगितली.

धूम्रकेतु – द्बिभूज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी अवतार. वाहन निळा घोडा. हा अवतार कलियुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल असे सांगितले जाते. विष्णूच्या कल्की अवतारावरून कल्पित.
गणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथाच्या रचनाकाळात मतभेद आहेत.यांची रचना साधारणपणे इस ११०० ते इस १४०० मध्ये झाल्याचे मानले जाते. सामान्यपणे गणेश पुराण हा आधीचा व मुद्गल पुराण नंतरचा ग्रंथ मानतात. गणपती अथर्वशीर्षाची रचना इसवीसनाच्या सोळा ते सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या काळात झाली.


गणेश पुराण – गणेश पुराण गणेशाच्या कथा व पूजापद्धती यासाठी हे पुराण महत्वाचे आहे. याचे दोन खंड आहेत - उपासनाखंड आणि क्रीडाखंड किंवा उत्तरखण्ड. । उपासनाखण्डाची अध्यायसंख्या ९२ असून क्रीडाखंडाची अध्यायसंख्या १५५ आहे. उपासनाखंडाच्या ३६ अध्यायांच्या आधारे प्रसिद्ध गणेश सहस्रनाम स्तोत्राची रचना झाली आहे. याचा अनेक ठिकाणी पाठ होतो. क्रीडाखंडाचे अध्याय १३८-४८ गणेश गीता नावाने प्रसिद्ध आहेत. गणपतीने आपल्या गजानन अवतारात ही गीता राजा वरेण्य यास सांगितली. याचे स्वरूप भगवद्गीता ग्रंथाप्रमाणे आहे. कृष्णाऐवजी येथे गणपतीस भगवद्-तत्त्व मानले आहे. क्रीडाखंडात गणपतीच्या चार अवतारांचे वर्णन आहे.


मुद्गल पुराण – यात गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


गणपती अथर्वशीर्ष – गणेश अथर्वशीर्ष किंवा गणेश अथर्वशीर्षोपनिषद हा गणपतीविषयीचे अप्रधान उपनिषद आहे. महाराष्ट्र राज्यात याचा विशेष प्रभाव आहे. रांजणगाव येथील मंदिरात प्रवेशतोरणावर हा ग्रंथ कोरला आहे. या ग्रंथात गणपतीस सर्व देवीदेवतांच्या रूपात पाहण्यात आले असून सर्व देवतांपेक्षा वरचा मानन्यात आले आहे. या ग्रंथावर तंत्रमताचाही प्रभाव आहे. ‘गं’ हा गणपतीचा बीजमंत्र आहे असा उल्लेख या ग्रंथात येतो


-----------------------------------------------------------

संदर्भ : सदर माहिती हि gajanangurudarshan.blogspot.com मधून घेण्यात आली असून सर्व फोटो हे freepik या वेबसाईट वरून वापरले आहे. माहितीमध्ये काही बदल असू शकतो. लेखकप्रकाशक या लेखातील माहितीशी सहमत असतील असे नाही.  

(आमचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामयूट्यूबट्विटरलिंक्डइनवर फॉलो करू शकता.)

Comments

Popular posts from this blog

नवीन वर्ष, नवीन सुरुवात: टू-डू लिस्ट आणि जर्नल लेखन

नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात. आपले ध्येय गाठण्यासाठी आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. यासाठी टू-डू लिस्ट आणि जर्नल लेखन हे दोन खूप प्रभावी साधन आहेत. टू-डू लिस्ट: ही एक अशी यादी आहे ज्यामध्ये आपण आपले सर्व काम , प्रोजेक्ट्स आणि ध्येय लिहून ठेवतो. ही यादी आपल्याला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास आणि आपले वेळ व्यवस्थापन सुधारण्यास मदत करते. जर्नल लेखन: जर्नल लेखन म्हणजे आपल्या विचारां , भावना आणि अनुभवांना शब्द देणे. हे आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि आपल्या मानसिक आरोग्याला सुधारण्यास मदत करते.   टू-डू लिस्टसाठी टिपा: दिवसाच्या सुरुवातीला यादी तपासा. छोटे (शॉर्ट टर्म) व दीर्घकालीन (लाँग टर्म) उद्दिष्टांची यादी. रोजच्या महत्त्वाच्या गोष्टींची टू-डू लिस्ट. प्रत्येक कामाचे वर्णन स्पष्ट आणि संक्षिप्त असावे. सर्वात महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या आणि त्यांना वरच्या बाजूला लिहा. आपण जे काम करू शकतो तेच काम यादीत समाविष्ट करा. पूर्ण झालेली कामे काढून टाका आणि नवीन कामे यादीत जोडा. पूर्ण झालेल्या कामांवर चेकमार्क करा ( ✅...

डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत - पासवर्ड

आजकाल आपले बरेचसे आयुष्य ऑनलाइन जगात व्यतीत होते. आपले बँक खाते, सोशल मीडिया, ईमेल आणि इतर अनेक महत्त्वाचे अकाउंट्स आपण इंटरनेटच्या माध्यमातून वापरतो. या डिजिटल जगात आपली माहिती सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती आपल्या पासवर्डची! कमजोर पासवर्ड तुमच्या अकाउंट्सला हॅकर्ससाठी खुले निमंत्रण देऊ शकतो. म्हणूनच, मजबूत पासवर्ड कसा बनवायचा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचा पासवर्ड तुमच्या डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत आहे. कमजोर पासवर्ड हॅकिंगसाठी आमंत्रण ठरू शकतो. आजच तुमच्या सर्व महत्त्वाच्या खात्यांचे पासवर्ड तपासा आणि त्यांना अधिक मजबूत करा. मजबूत पासवर्ड म्हणजे काय? मजबूत पासवर्ड म्हणजे असा संकेतशब्द जो सहजपणे ओळखता येत नाही किंवा हॅक करता येत नाही. तो अक्षरे, अंक आणि चिन्हे यांचा योग्य मेळ असतो आणि तो वैयक्तिक माहितीवर आधारित नसतो. मजबूत पासवर्ड बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स: लांबी महत्त्वाची: तुमचा पासवर्ड शक्यतो किमान ८ अक्षरांपेक्षा जास्त लांबीचा असावा. जास्त लांब पासवर्ड क्रॅक करणे अधिक कठीण असते. अक्षरांचे मिश्रण: पासवर्ड...

नवीन स्मार्टफोन खरेदीसाठी मार्गदर्शक टिप्स जाणून घ्या

 आज आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच वेळा आपण काही गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपल्याला भविष्यात त्रास होऊ शकतो किंवा आर्थिक नुकसानही होऊ शकतं. म्हणूनच, स्मार्टफोन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी आणि कधी खरेदी करावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. बाजारात स्मार्टफोन घेण्यासाठी गेल्यावर काही गोष्टींची काळजी घेतल्यास भविष्यात होणारे नुकसान टाळता येते. अनेकदा स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टींची व्यवस्थित तपासणी करणे गरजेचे असते, कारण त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून, स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची माहिती असावी आणि तो कधी खरेदी करावा, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. आजच्या डिजिटल जगात स्मार्टफोन फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही, तर तो आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. फोटो काढणे, बँकेचे व्यवहार करणे, सोशल मीडियावर कनेक्टेड राहणे, ऑफिसचे काम करणे आणि मनोरंजन करणे हे सर्व काही आता एकाच डिव्हाइसमध्ये शक्य झाले आहे. यावरून स्मार्ट...