आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की गणपती बाप्पाला मोदक प्रचंड आवडतात. बाप्पाला अनेक प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दिला जातो
. पण जिथं बाप्पा तिथं मोदक हे समीकरण नेहमीच ठरलेलं असतं.

मोदक हा केवळ एक पदार्थ नव्हे, तर तो भावनांचा, श्रद्धेचा आणि संस्कृतीचा वाहक आहे. गणपती बाप्पा आणि मोदक हे एकमेकांना पूरक आहेत. मोदक खाल्ले की आपल्या मनात एक आनंददायी शांति निर्माण होते.
काजू मोदक, उकडीचे मोदक, मोतीचूर मोदक, माव्याचे मोदक, लाल गव्हाचे मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य गणपतीच्या दिवसात बाप्पासाठी तयार केला जातो. पण गणपतीला मोदक इतके का आवडतात तुम्हाला माहित आहे का?
एकदा गणपती माता पार्वती आणि भगवान शिव यांच्यासह अनुसया यांच्या घरी गेले. आई अनुसयाने विचार केला की प्रथम गणपतीला जेवण द्यावे. जेवण वाढल्यानंतरही गणपतीची भूक संपत नव्हती. अनुसयाने विचार केला की जर मी काहीतरी गोड खाऊ घातले तर कदाचित गणपतीचे पोट भरेल. त्यावेळी त्यांनी गणपतीला मोदक खायला घातले. त्यानंतर लगेचच गणपतीचं पोट भरलं आणि मोठा ढेकर घेतला.
मोद म्हणजे आनंद. गणपती नेहमी आनंदी असतात आणि त्यांच्या भक्तांचे दुःख दूर करतात आणि त्यांच्या जीवनात आनंद आणतात. म्हणूनच गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हणतात. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी भक्त मोदक अर्थात आनंदही देतात.
गणपतीला 21 मोदक अर्पण केले गेले तर त्यांच्याबरोबर इतर सर्व देवतांचेही पोट भरले जाते. याच कारणामुळे नैवे्द्यात गणपतीला मोदक अर्पण केला जातो. जेणेकरून त्याच्याबरोबर इतर सर्व देवतांचे आशीर्वादही मिळू शकतील.
संदर्भ : सदर माहिती हि FB मधून घेण्यात आली असून सर्व फोटो हे freepik या वेबसाईट वरून वापरले आहे. माहितीमध्ये काही बदल असू शकतो. लेखक, प्रकाशक या लेखातील माहितीशी सहमत असतील असे नाही.
(आमचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर, लिंक्डइन, वर फॉलो करू शकता.)
Comments
Post a Comment