Skip to main content

ऍपल इव्हेंट 2024 हायलाइट्स : iPhone16

ॲपलच्या ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंट काल सोमवारी स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये क्यूपर्टिनोकॅलिफोर्निया येथील मुख्यालयात पार पडलाजो आपल्यातील अनेकांनी लाईव्ह पहिला असेल. या कार्यक्रमाला अनेक तंत्रज्ञान प्रेमींची हजेरी सुद्धा लावली होती. त्यानंतर काही वेळात ॲपलचे सीइओ टिम कूक यांच्या रेकॉर्डेड भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर या इव्हेंटमध्ये ॲपल वॉच १०आयफोन १६आयफोन प्लस १६आयफोन प्रो १६आयफोन मॅक्स १६ॲपल वॉच एसईॲपल वॉच अल्ट्रा २एअरपॉड्स ४ लाँच करण्यात आला आहे. ॲपलच्या ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटमध्ये लाँच झालेल्या प्रोडक्ट्सचे फीचर्स काय असणारतसेच त्यांची भारतात किंमत काय असणार त्याबद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात.

 


आयफोन १६ (iPhone 16) :
ॲपल एअरपॉडस् ४ (Apple AirPods 4)
ॲपल वॉच १० (Apple Watch Series 10) :

आयफोन १६ मध्ये कस्टमाइज ॲक्शन बटनकॅमेरा कंट्रोल बटन असणार आहे. आयफोन १६ मध्ये ए १८ नवीन चीप असेल ; जी १५ पेक्षा ३० टक्के वेगात करणार करून ऊर्जेचा ३० टक्के बचत सुद्धा करेल. आयफोन १६ मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले तर देण्यात आला आहे. तसेच यात iOS 18 सह Apple Intelligence (AI) सिस्टम देण्यात आली आहे. खास गोष्ट म्हणजे आता iPhone 16 मॉडेल्स AAA गेम्सला सपोर्ट करतील. आणि दोन्ही मॉडेल्स यूएसबी टाईप-सी ( Type-C) पोर्ट सह येतात. आयफोन १६ मध्ये मोठी बॅटरीसह वेगवान चार्जिंग होणार आहे.


आयफोन१६ मध्ये प्रायव्हसी प्रॉमिस असेल
 ; ज्यामुळे तर थर्ड पार्टीही व्हेरिफिकेशन करू शकेल. अर्थात प्रायव्हसीची खातरजमा अगदी व्यवस्थित होईल. आयफोन १६ तुम्हाला हव्या असलेल्या फोटोच्या माध्यमातून तुमच्या आठवणींचा शोध घेण्यात मदत करेल. कारण – सिरीही एआयच्या मदतीने अधिक स्मार्ट झाला आहे. तुम्ही फक्त ॲपल इंटेलिजन्सच्या मदतीने सिरीला आदेश द्यातो तुमचे काम काही सेकेंदातअधिक सोप्पे करून देईल. तसेच खास गोष्ट अशी कीआयओएस १८ सह येणारा ॲपल इंटेलिजन्स जगातील अनेक भाषांमध्ये येणार आहे. 


ॲपल एअरपॉडस् ४ (Apple AirPods 4)

एअरपॉडस् ४ मध्ये चार्जिंग केस आता यूएसबी-सी ( USB-C) पोर्टसह असणार आहे. तसेच इतरांशी संवाद साधताना एअरपॉडस्चा आवाज कमी होईल आणि बोलणं संपल्यावर पुन्हा आवाज पहिल्यासारखा येईल. मशीन लर्निंगचा नवा अवतारसह एअरपॉडस् फोर ४ मध्ये आता वायरलेस चार्जिंग सुद्धा युजर्ससाठी उपलबद्ध करून देण्यात आलं आहे.तसेच सिरीला प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही ‘होय’ किंवा ‘नाही’ म्हणून तुम्ही डोकं हलवू उत्तर देऊ शकता.याचबरोबर तुम्हाला ३० तासांची बॅटरी लाईफ सुद्धा मिळणार आहे.

एअरपॉडस् प्रो मध्ये आता हिअरिंग प्रोटेक्शन देण्यात येणार आहेज्यामुळे कानाच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे. एअरपॉडस् हिअरिंग एडचेही काम करणार आणि बहिरेपणा टाळण्यास मदत करणार आहे. 


ॲपलच्या (Apple) ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटची सुरुवात इंटेलिजन्ट ॲपल वॉचने १० ने झाली. या वॉचमध्ये तुम्हाला मोठा डिस्प्लेस्क्रीनवरचा मजकूर वेगात वाचता यावा यासाठी स्क्रीन एरिआ ३० टक्क्यांनी वाढवला सुद्धा आहे. ॲपल वॉचवर टाइप करणेही सोप्पे होणार आहे. ॲपल वॉच १० मध्ये जेट ब्लॅक फिनिशॲल्यिमिनियम अलॉयमधील बॉडीआकाररचना आणि वजन सारे काही नवीन असणार आहे. तसेच स्पीकरचा आकार ३० टक्क्यांनी कमी पण तरीही अगदी स्पष्ट ऐकू येईल असा देण्यात आला आहे. तर सगळ्यात महत्वाचे आणि युजर्ससाठी उपयोगी असे फास्टेट चार्जिंक ॲपल वॉच ३० सेकंदात ८० टक्के चार्जिंग करून देणार आहे. तसेच हे वॉच तुम्हाला तीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे.


याचबरोबर ॲपल वॉच १० ला टायटॅनियम बॉडी असणार आहे. हे वॉच तुमच्या निद्रानाशाचा
तुमच्या श्वासांमधील अनियमिततेचा शोध घेण्यास मदत करणार आहे. तसेच युजर्सना वॉचमध्ये स्लीप अप्निया नोटिफिकेशनही मिळेल. त्याचबरोबर तुमची झोप किती चांगली झाली आहेयाचे विश्लेषण ॲपल वॉच एका नोटिफिकेशनमध्ये देईल. तुम्ही पाण्यात गेल्यावर तुमच्या आरोग्याचीही काळजी घेईल. या सगळ्या फीचर्सबरोबर ॲपल वॉच १० हे आजवरचे सर्वात पातळ (थिन) वॉच ठरणार आहे.


त्याचबरोबर ॲपल ( Apple) वॉच अल्ट्रा २ ची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे ; जे प्रामुख्याने खेळाडूंसाठी डिझाइन करण्यात आले आहे. ॲपल वॉच अल्ट्रा 2 सॅटिन ब्लॅकमध्ये स्क्रॅच प्रतिरोधक केसपॅराशूट लॉक-इन मेकॅनिझमसह ब्लॅक टायटॅनियम बँड्ससह उपलब्ध असणार आहे. ॲपल वॉच अल्ट्रा २ ची किंमत अमेरिकन डॉलर ७९९ ($799) पासून सुरू होते आणि २० सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्द असणार आहे.

 


कार्यक्रमात लाँच झालेल्या ॲपल ( Apple) प्रोडक्टची भारतातील काय असणार किंमत ?

भारतात ॲपल (Apple) आयफोन १६ ची किंमत ७९,९०० पासून सुरू होईल. आयफोन १६ प्लसची किंमत ८९,९०० रुपयांपासूनतर आयफोन १६ प्रोची किंमत १,१९,००० रुपयांपासून सुरू होऊ शकते. तर आयफोन प्रो मॅक्सची किंमत १,४४,९०० रुपयांपासून सुरू होऊ शकते. तसेच ॲपल वॉच सिरीज १० ची किंमत ४६,९०० रुपये ॲपल वॉच एसई २४,९०० रुपये ॲपल वॉच अल्ट्रा २ ची किंमत ८९९०० रुपयांपासून सुरु होईल तर एअरपॉड्स ४ ची किंमत १२,९०० रुपयांपासून सुरु होणार आहे ; असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

-----------------------------------------------------------

संदर्भ : सदर माहिती हि  www.loksatta.com मधून घेण्यात आली असून सर्व फोटो हे @Apple / युट्युब / स्क्रिनशॉट) यावरून वापरले आहे. माहितीमध्ये काही बदल असू शकतो. लेखकप्रकाशक या लेखातील माहितीशी सहमत असतील असे नाही.  

(आमचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामयूट्यूबट्विटरलिंक्डइनवर फॉलो करू शकता.)



 


 


Comments

Popular posts from this blog

नवीन वर्ष, नवीन सुरुवात: टू-डू लिस्ट आणि जर्नल लेखन

नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात. आपले ध्येय गाठण्यासाठी आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. यासाठी टू-डू लिस्ट आणि जर्नल लेखन हे दोन खूप प्रभावी साधन आहेत. टू-डू लिस्ट: ही एक अशी यादी आहे ज्यामध्ये आपण आपले सर्व काम , प्रोजेक्ट्स आणि ध्येय लिहून ठेवतो. ही यादी आपल्याला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास आणि आपले वेळ व्यवस्थापन सुधारण्यास मदत करते. जर्नल लेखन: जर्नल लेखन म्हणजे आपल्या विचारां , भावना आणि अनुभवांना शब्द देणे. हे आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि आपल्या मानसिक आरोग्याला सुधारण्यास मदत करते.   टू-डू लिस्टसाठी टिपा: दिवसाच्या सुरुवातीला यादी तपासा. छोटे (शॉर्ट टर्म) व दीर्घकालीन (लाँग टर्म) उद्दिष्टांची यादी. रोजच्या महत्त्वाच्या गोष्टींची टू-डू लिस्ट. प्रत्येक कामाचे वर्णन स्पष्ट आणि संक्षिप्त असावे. सर्वात महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या आणि त्यांना वरच्या बाजूला लिहा. आपण जे काम करू शकतो तेच काम यादीत समाविष्ट करा. पूर्ण झालेली कामे काढून टाका आणि नवीन कामे यादीत जोडा. पूर्ण झालेल्या कामांवर चेकमार्क करा ( ✅...

डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत - पासवर्ड

आजकाल आपले बरेचसे आयुष्य ऑनलाइन जगात व्यतीत होते. आपले बँक खाते, सोशल मीडिया, ईमेल आणि इतर अनेक महत्त्वाचे अकाउंट्स आपण इंटरनेटच्या माध्यमातून वापरतो. या डिजिटल जगात आपली माहिती सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती आपल्या पासवर्डची! कमजोर पासवर्ड तुमच्या अकाउंट्सला हॅकर्ससाठी खुले निमंत्रण देऊ शकतो. म्हणूनच, मजबूत पासवर्ड कसा बनवायचा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचा पासवर्ड तुमच्या डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत आहे. कमजोर पासवर्ड हॅकिंगसाठी आमंत्रण ठरू शकतो. आजच तुमच्या सर्व महत्त्वाच्या खात्यांचे पासवर्ड तपासा आणि त्यांना अधिक मजबूत करा. मजबूत पासवर्ड म्हणजे काय? मजबूत पासवर्ड म्हणजे असा संकेतशब्द जो सहजपणे ओळखता येत नाही किंवा हॅक करता येत नाही. तो अक्षरे, अंक आणि चिन्हे यांचा योग्य मेळ असतो आणि तो वैयक्तिक माहितीवर आधारित नसतो. मजबूत पासवर्ड बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स: लांबी महत्त्वाची: तुमचा पासवर्ड शक्यतो किमान ८ अक्षरांपेक्षा जास्त लांबीचा असावा. जास्त लांब पासवर्ड क्रॅक करणे अधिक कठीण असते. अक्षरांचे मिश्रण: पासवर्ड...

नवीन स्मार्टफोन खरेदीसाठी मार्गदर्शक टिप्स जाणून घ्या

 आज आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच वेळा आपण काही गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपल्याला भविष्यात त्रास होऊ शकतो किंवा आर्थिक नुकसानही होऊ शकतं. म्हणूनच, स्मार्टफोन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी आणि कधी खरेदी करावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. बाजारात स्मार्टफोन घेण्यासाठी गेल्यावर काही गोष्टींची काळजी घेतल्यास भविष्यात होणारे नुकसान टाळता येते. अनेकदा स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टींची व्यवस्थित तपासणी करणे गरजेचे असते, कारण त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून, स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची माहिती असावी आणि तो कधी खरेदी करावा, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. आजच्या डिजिटल जगात स्मार्टफोन फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही, तर तो आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. फोटो काढणे, बँकेचे व्यवहार करणे, सोशल मीडियावर कनेक्टेड राहणे, ऑफिसचे काम करणे आणि मनोरंजन करणे हे सर्व काही आता एकाच डिव्हाइसमध्ये शक्य झाले आहे. यावरून स्मार्ट...