श्री गणेश, हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक आहेत. विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाणारे, ते बुद्धी, ज्ञान आणि नवीन सुरुवातीचे देवता आहेत. त्यांचे पूजन कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला केले जाते, कारण असे मानले जाते की ते सर्व अडचणी दूर करतात आणि यश मिळवून देतात. परिवार माहिती :- श्रीगणपती देवता वाहन: उंदीर शस्त्र: पाश, अंकुश, परशु, दंत वडील: देव शंकर आई: देवी पार्वती पत्नी: देवी ऋद्धी, देवी सिद्धी पुत्र: शुभ, लाभ भाऊ: श्री कार्तिकेय वहिनी: देवसेना देवी बहिनः अशोकसुंदरी सासरे: विश्वकर्मा सासु: भुवना देवी अन्य नावे/ नामांतरे ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण गणपतीची बारा नावे १.वक्रतुंड २. एकदंत ३.कृष्णपिंगाक्ष ४. गजवक्त्र ५.लंबोदर ६.विकट ७.विघ्नराजेंद्र ८.धूम्रवर्ण ९.भालचंद १०.विनायक ११.गणपती १२.गजानन गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. नावे:- पुराणांमध्ये गणपती हा शिवहर, पार्वतीपुत्र या नावांनी व शंकरपार्वतींचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. गणपतीला इतर काही नावे आहे...
Vikas Agawane is a Artist and Graphics Designer. With good painting he turned to graphics design and is working as an excellent designer.