नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात. आपले ध्येय गाठण्यासाठी आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. यासाठी टू-डू लिस्ट आणि जर्नल लेखन हे दोन खूप प्रभावी साधन आहेत. टू-डू लिस्ट: ही एक अशी यादी आहे ज्यामध्ये आपण आपले सर्व काम , प्रोजेक्ट्स आणि ध्येय लिहून ठेवतो. ही यादी आपल्याला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास आणि आपले वेळ व्यवस्थापन सुधारण्यास मदत करते. जर्नल लेखन: जर्नल लेखन म्हणजे आपल्या विचारां , भावना आणि अनुभवांना शब्द देणे. हे आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि आपल्या मानसिक आरोग्याला सुधारण्यास मदत करते. टू-डू लिस्टसाठी टिपा: दिवसाच्या सुरुवातीला यादी तपासा. छोटे (शॉर्ट टर्म) व दीर्घकालीन (लाँग टर्म) उद्दिष्टांची यादी. रोजच्या महत्त्वाच्या गोष्टींची टू-डू लिस्ट. प्रत्येक कामाचे वर्णन स्पष्ट आणि संक्षिप्त असावे. सर्वात महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या आणि त्यांना वरच्या बाजूला लिहा. आपण जे काम करू शकतो तेच काम यादीत समाविष्ट करा. पूर्ण झालेली कामे काढून टाका आणि नवीन कामे यादीत जोडा. पूर्ण झालेल्या कामांवर चेकमार्क करा ( ✅...
Vikas Agawane is a Artist and Graphics Designer. With good painting he turned to graphics design and is working as an excellent designer.