आपण मोबाईलवर रोज अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहत असतो, अशा व्हिडिओला मिलियन व्हीव्ज असतात, नक्की आपण काय बघत आहे, अशी कोणती तरी लिंक येते आणि मग त्यावर तुम्ही क्लिक करता पुन्हा त्याला काही व्हिडिओ खालून येतात. स्क्रोल करतात करतात आणि तुम्ही एका ट्रकमध्ये अडकतात बरोबर त्या जाळ्यात अडकतात.
या सर्व फोटोंची रचना अशी केलेली असते की ज्यामध्ये बरोबर तुम्ही अडकणार आणि त्याच्या नंतर तुम्हाला त्याची नशा होणार. तुम्ही त्या व्यसनात अडकणार अशा व्हिडिओमुळे इतरांचा खूप फायदा होतो मात्र तुम्ही प्रचंड मोठ्या जाळ्यात अडकता. प्रगती तर सोडा, तुम्ही तुमच्या आयुष्यात मागे खेचले जाता.
यावर उपाय काय ?
आता मी तुम्हाला काही सूत्र सांगणार आहे की ज्याच्याने या सगळ्या सोशल मीडियावर च्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा तर नक्की होईल तुमचं नुकसान जे होतंय ते होणार नाही. काही सूत्र आहे.
पहिले सूत्र: जे ठरवलंय तेच बघायचं
आधी ठरवायचं काय आपल्याला बघायचं, म्हणजे काय करायचं तुमच्या क्षेत्राबद्दल, तुम्हाला जे नॉलेज पाहिजे त्याबद्दल, व्याख्यानाबद्दल, तुम्हाला जे काही माहिती पाहिजे ते आधीच ठरवा, त्याची लिस्ट तयार करा.आणि त्याचे फोल्डर तयार करा.आणि मग जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा किंवा तुम्ही कोणत्या वेळा ठरवल्या असेल त्या वेळेला तेच बघायचं. मनोरंजन असेल काही नॉलेज असेल, जे ठरवलंय तेच बघायचं.
जे नाही बघायचं ते पण ठरवायचं म्हणजे काय सोपे आहे. जे जे गॉसिप आहे, कशा कशात गॉसिप आहे फिल्मी, राजकारण, धर्म, अश्चील व्हिडिओ. हे सगळं, नाही बघायचं
लोकांच्या जीवनातील गॉसिप बघून,ऐकून तुमचं भल होईल असं वाटतं तुम्हाला. कधीच नाही त्याच्यामुळे आपल्याला हे पाळायला लागेल आणि मग काय होईल माहित आहे तुम्हाला जे आपोआप समोर येत ते मुळीच बघायचं नाही ते जाळ टाकलेय तुमच्यासाठी, तो तुम्हाला फसवणार. मला सांगा अस सहज काही होत का , कोणी तरी काही तरी टाकत समोरून. म्हणजे आपल्याला नाही ते बघायचं. जीवनाचा कंट्रोल आपल्या प्रत्येक क्षणाचं कंट्रोल हे आपल्या हातात पाहिजे त्याचे कारण असे मित्रांनो आपण जे बघतो वाचतो ऐकतो तसेच आपण बनतो. आणि हे व्यसन असल्यामुळे काय होत, एक प्रकारचा व्हिडिओ बघितला कि तसे शेकडो व्हिडिओ येत जातात आणि आपण ते बघत जातो, बघत जातो. आणि आपली पूर्ण मानसिकता तशी होते
दुसरा सूत्र : ठरवा किती वेळ द्यायचा
कितीवेळ बघायचं, दिवसातून जास्तीत जास्त दीड दोन तास, तेही ८० / २० प्रमाण. म्हणजे ८० टक्के कामासंदर्भात बघा. 20% तुम्ही मनोरंजनाचे बघा. सलग ३० मिनिटांहून जास्त पाहू नका. नाहीतर तुमचे डोळे मेंदू पाठ याची वाट लागेल आणि ठरवलेल्या वेळात हे करा. वेळ मिळाला की स्क्रोल स्क्रोल स्क्रोल आणी पुन्हा जाळ्यात अडकाल. म्हणून वेळ ठरवा तेव्हाच व्हिडिओ बघायचे आणि सगळ्यात महत्वाचं- महत्त्वाची कामं संपल्यावरच आणि कुटुंबाला थोडावेळ दिल्यानंतरच हे व्हिडीओ बघा एक दिवस शक्य असेल तर उपवास करा त्या दिवशी कुठलाच व्हिडिओ कुठल्याच सोशल मीडियावर बघू नका आणि रात्री दहानंतर कुठलाच व्हिडिओ पाहू नका.
तिसरे सूत्र : ठरवा तुमची निवड
हे व्हिडिओ निवडायचे कसे आणि स्वत:वर नियंत्रण कसे ठेवायचे. कोणताही व्हिडिओ निवडताना खालील ३ गोष्टी स्वत:ला आधी विचारा.
१.हे माझ्या उपयोगाच आहे का ?
२.हे गरजेचे आहे का ?
३.हे अर्जेन्ट आह का ?
याची होय असेल तरच ते बघा. दुसरं तुम्हाला आनंदासाठी बघायचं असेल तर खरच आनंदीदाई आहे कि परत आपल्याला पश्चाताप होईल असं काही आहे तेही चेक करा. यातून होत नसेल ना सरळ सरळ लॉक लावा, टाईमर लावा. सुविधा सर्व मध्ये दिलेली आहे
चौथे सूत्र : तुम्ही बघाल त्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट तुम्ही नोंदवा
ते आपल्या आयुष्यात कसे वापरता येतील त्याचा प्लान करा प्रत्यक्ष तसं करा आणि मगच नंतरचा व्हिडीओ बघा
हे जर ४ सूत्र तुम्ही पाळलेत तर तुम्हाला या सगळ्या टेक्नॉलॉजीचा प्रचंड फायदा होईल आणि नुकसान मात्र होणार नाही तर काय होईल माहितीये तुम्हाला याची सवय लागेल व्यसन लागेल आणि त्या ट्रकमध्ये तुम्ही अडकाल.
तुम्हाला माहिती मित्र-मैत्रिणींना सकाळपासून रात्रीपर्यंत आपण कामावर असल्यासारखे असते तर तुम्ही त्याच्यावर लागलेले राहतात आणि कोणीतरी पैसे कमवत राहतं असा स्वतःचा उपयोग होऊ नका देऊ आणि आयुष्यात सर्वात महत्वाचे असते वेळ कधीच परत मिळत नाही पैसे देऊन सुद्धा मिळत नाही. अशी वाया जाऊ नका.
Nice one 👌
ReplyDeletethank you !
Delete