Skip to main content

गुगल फोटो एक्स्पोर्ट करण्यासाठी गुगलचे नवे टूल #google #googlephotos #googletakeout

गुगल आता Google Photos या आपल्या अ‍ॅप्लिकेशनसाठी फ्री स्टोरेज सुविधा (Free Storage) बंद करणार आहे. जगभरातले कोट्यवधी युजर्स Google photos हे अ‍ॅप्लिकेशन वापरतात. 1 जूनपासून गुगल प्रत्येक अकाउंटला एकूण 15 जीबी क्लाउड स्टोरेज देणार असून, त्यात गुगलच्या सगळ्या प्रॉडक्ट्समधल्या डेटाचा समावेश आहे. म्हणजेच एका अकाउंटचं Gmail, Google Docs, Sheets, Drives आणि गुगलच्या अन्य सेवांमध्ये मिळून एकूण 15 जीबी डेटा मोफत साठवता येऊ शकतो.



15 जीबीपेक्षा जास्त स्टोरेजसाठी आता Google One चं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. त्यात 100 जीबीच्या स्टोरेजसाठी 19.99 डॉलर्स अर्थात भारतीय चलनात सुमारे 1460 रुपये भरावे लागतील.

1 जून 2021 पूर्वी गुगल अकाउंटवर अपलोड करण्यात आलेले फोटो किंवा व्हिडीओ, या मोफत 15 जीबी स्टोरेजमध्ये समाविष्ट असणार नाहीत, असं गुगलने स्पष्ट केलं आहे.

तुमच्या अकाउंटची 15 जीबी डेटा स्पेस संपत आली असेल, तर गुगलद्वारे ई-मेलने कळवलं जाईल. स्टोरेज स्पेस संपली असली, तरी चिंता करण्याची काही गरज नाही. कारण Google One किंवा अन्य कोणतीही क्लाउड स्टोरेज सेवा खरेदी करून डेटा स्टोअर करता येऊ शकतो. त्यासाठी गुगल अकाउंटवरचा डेटा कशा पद्धतीने सुरक्षितपणे डाउनलोड करायचा, हे माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी Google Takeout ही सुविधा उपलब्धआहे. Google Takeout हे असं टूल आहे, ज्याद्वारे कीप नोट्स, मेल मेसेजेस, गुगल क्रोम हिस्ट्री अशा अनेक गुगल अ‍ॅप्समधली आपली माहिती युजर एक्स्पोर्ट करू शकतो.


सगळे फोटोज डाउनलोड करण्यासाठी 

  • takeout.google.com यावर जावं. आपल्या गुगल अकाउंटला लॉगिन करावं लागेल.

  • त्यात ‘Create a New Export’ वर क्लिक करावं. त्यात तुम्हाला गुगलच्या कोणकोणत्या सेवांमधला कंटेंट डाउनलोड करायचा आहे हे सिलेक्ट करता येतं. तुम्हाला फक्त फोटोच डाउनलोड करायचे असतील, तर तेवढाच पर्याय सिलेक्ट करावा.
  • ‘select data to include’ या टॅबमध्ये ‘deselect all’ वर क्लिक करावं. त्यानंतर Google Photos सिलेक्ट करावं. ‘all photo albums included’ यावर क्लिक केलं, तर तुम्हाला एखादा विशिष्ट अल्बमही सिलेक्ट किंवा डीसिलेक्ट करता येऊ शकेल.

  • अल्बम सिलेक्ट केल्यानंतर OK वर क्लिक करावं. त्यानंतर डेटा एक्स्पोर्टचे अनेक पर्याय उपलब्ध होतील.
  • युजर्सना त्यांचा डेटा, फोटोज कशा पद्धतीने डाउनलोड करायचा, हे निवडता येतं.
  • त्यांच्या ई-मेलवर डाउनलोड लिंक स्वीकारण्याचा पर्याय असतो. इथे send download link via email link हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तसंच, ड्रॉपबॉक्स, वनड्राइव्ह किंवा बॉक्स अशा अन्य क्लाउड पर्यायांतही डेटा पाठवता येतो.
  • सगळा डेटा एकाच वेळी एक्स्पोर्ट करायचा आहे, की ठरावीक दिवसांनी करायचा आहे, हे सिलेक्ट करता येतं. तसंच फाइलचा प्रकारही ठरवता येतो.

  • अल्बम सिलेक्ट केल्यानंतर OK वर क्लिक करावं. त्यानंतर डेटा एक्स्पोर्टचे अनेक पर्याय उपलब्ध होतील.
  • युजर्सना त्यांचा डेटा, फोटोज कशा पद्धतीने डाउनलोड करायचा, हे निवडता येतं.
  • त्यांच्या ई-मेलवर डाउनलोड लिंक स्वीकारण्याचा पर्याय असतो. इथे send download link via email link हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तसंच, ड्रॉपबॉक्स, वनड्राइव्ह किंवा बॉक्स अशा अन्य क्लाउड पर्यायांतही डेटा पाठवता येतो.

सगळा डेटा एकाच वेळी एक्स्पोर्ट करायचा आहे, की ठरावीक दिवसांनी करायचा आहे, हे सिलेक्ट करता येतं. तसंच फाइलचा प्रकारही ठरवता येतो.



अशाच नवनवीन माहितीसाठी https://rb.gy/mdfk4d या लिंकवर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
sites.google.com/view/vikasagawane


संदर्भ : https://lokmat.news18.com/technology/how-to-take-backup-of-google-photos-this-google-photos-free-storage-service-stop-working-from-1-june-2021-gh-555161.html

Comments

Popular posts from this blog

नवीन वर्ष, नवीन सुरुवात: टू-डू लिस्ट आणि जर्नल लेखन

नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात. आपले ध्येय गाठण्यासाठी आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. यासाठी टू-डू लिस्ट आणि जर्नल लेखन हे दोन खूप प्रभावी साधन आहेत. टू-डू लिस्ट: ही एक अशी यादी आहे ज्यामध्ये आपण आपले सर्व काम , प्रोजेक्ट्स आणि ध्येय लिहून ठेवतो. ही यादी आपल्याला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास आणि आपले वेळ व्यवस्थापन सुधारण्यास मदत करते. जर्नल लेखन: जर्नल लेखन म्हणजे आपल्या विचारां , भावना आणि अनुभवांना शब्द देणे. हे आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि आपल्या मानसिक आरोग्याला सुधारण्यास मदत करते.   टू-डू लिस्टसाठी टिपा: दिवसाच्या सुरुवातीला यादी तपासा. छोटे (शॉर्ट टर्म) व दीर्घकालीन (लाँग टर्म) उद्दिष्टांची यादी. रोजच्या महत्त्वाच्या गोष्टींची टू-डू लिस्ट. प्रत्येक कामाचे वर्णन स्पष्ट आणि संक्षिप्त असावे. सर्वात महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या आणि त्यांना वरच्या बाजूला लिहा. आपण जे काम करू शकतो तेच काम यादीत समाविष्ट करा. पूर्ण झालेली कामे काढून टाका आणि नवीन कामे यादीत जोडा. पूर्ण झालेल्या कामांवर चेकमार्क करा ( ✅...

डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत - पासवर्ड

आजकाल आपले बरेचसे आयुष्य ऑनलाइन जगात व्यतीत होते. आपले बँक खाते, सोशल मीडिया, ईमेल आणि इतर अनेक महत्त्वाचे अकाउंट्स आपण इंटरनेटच्या माध्यमातून वापरतो. या डिजिटल जगात आपली माहिती सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती आपल्या पासवर्डची! कमजोर पासवर्ड तुमच्या अकाउंट्सला हॅकर्ससाठी खुले निमंत्रण देऊ शकतो. म्हणूनच, मजबूत पासवर्ड कसा बनवायचा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचा पासवर्ड तुमच्या डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत आहे. कमजोर पासवर्ड हॅकिंगसाठी आमंत्रण ठरू शकतो. आजच तुमच्या सर्व महत्त्वाच्या खात्यांचे पासवर्ड तपासा आणि त्यांना अधिक मजबूत करा. मजबूत पासवर्ड म्हणजे काय? मजबूत पासवर्ड म्हणजे असा संकेतशब्द जो सहजपणे ओळखता येत नाही किंवा हॅक करता येत नाही. तो अक्षरे, अंक आणि चिन्हे यांचा योग्य मेळ असतो आणि तो वैयक्तिक माहितीवर आधारित नसतो. मजबूत पासवर्ड बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स: लांबी महत्त्वाची: तुमचा पासवर्ड शक्यतो किमान ८ अक्षरांपेक्षा जास्त लांबीचा असावा. जास्त लांब पासवर्ड क्रॅक करणे अधिक कठीण असते. अक्षरांचे मिश्रण: पासवर्ड...

नवीन स्मार्टफोन खरेदीसाठी मार्गदर्शक टिप्स जाणून घ्या

 आज आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच वेळा आपण काही गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपल्याला भविष्यात त्रास होऊ शकतो किंवा आर्थिक नुकसानही होऊ शकतं. म्हणूनच, स्मार्टफोन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी आणि कधी खरेदी करावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. बाजारात स्मार्टफोन घेण्यासाठी गेल्यावर काही गोष्टींची काळजी घेतल्यास भविष्यात होणारे नुकसान टाळता येते. अनेकदा स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टींची व्यवस्थित तपासणी करणे गरजेचे असते, कारण त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून, स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची माहिती असावी आणि तो कधी खरेदी करावा, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. आजच्या डिजिटल जगात स्मार्टफोन फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही, तर तो आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. फोटो काढणे, बँकेचे व्यवहार करणे, सोशल मीडियावर कनेक्टेड राहणे, ऑफिसचे काम करणे आणि मनोरंजन करणे हे सर्व काही आता एकाच डिव्हाइसमध्ये शक्य झाले आहे. यावरून स्मार्ट...