कोरोनाच्या या काळात बरेच वेळा आपण सर्व घरी असल्याने आरोग्याची काळजी घेत नाही, वजन वाढणे, हात पाय दुखणे, असे आजार सुरु होतात, यासाठी काही माझ्या वाचनात आलेल्या गोष्टी येथे सांगत आहे. घरगुती उपाय येथे सांगितले आहे.जर हे उपाय केले तर आपण आपले आरोग्य निरोगी ठेवू शकतो. घसा दुखत आहे ? घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते. घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे. कफ झाला -असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो. तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे. तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक,...
Vikas Agawane is a Artist and Graphics Designer. With good painting he turned to graphics design and is working as an excellent designer.