★ लॉकडाउन काळात काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे ओळखायला शिका.
शिवाजी महाराज गडावर सहा महिने राहिले होते तेथे राहून नियोजन करत होते त्यांनी त्यांची ताकद ओळखली यावर त्यांनी काम केलं आणि नंतर महत्त्वाचा निर्णय घेतला.
★ एक महत्त्वाचा विचार आहे की आपण काय करू शकतो या काळातच ठरवायला हवं
★ लॉकडाउन काळात आपण तीन चुका नक्की केल्या असतील त्या कोणत्या हे आपण खालील प्रमाणे पाहू
चूक क्र 1
चूक क्र 2
★ आज आपल्या भारतात जास्त जीवनावश्यक वस्तूंना महत्त्व दिलं जातं तर परदेशात चैनीच्या वस्तूंना सगळ्यात जास्त महत्त्व दिलं होतं त्यामुळे त्यांचा जास्त करून पैशाचा वापर होतो तर आपल्या भारतामध्ये कमी पैशात वापर होतो. आपण जास्त करून जीवनावश्यक वस्तू आणि प्रत्येक जीवाला महत्व दिला आहे
★ लॉकडाउन काय प्रॉब्लेम नाही किंवा आलेले खूप मोठं संकट नाही हा फक्त एक पोझ आहे यापेक्षा या काळात आपण खूप काही करू शकतो या नंतर भारत खूप वेगानं पुढे जाणार आहे. जे लोक विचार करतील आणि छान नियोजन करतील तेच पुढे जातील
★ सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही महत्वाचे लोकांशी संवाद साधा आधी त्याची चर्चा करा आणि त्यानंतर त्यावरती ॲक्शन घ्या
★ नंतर एक गोष्ट नक्की घडणार आहे ते म्हणजे काही लोक खूप श्रीमंत होणार आहेत आणि काही लोक खूप गरीब होणार आहेत
★ आज शिकण्याची वेळ आहे,भविष्याचा विचार करायला हवा
आपण आज पण नवीन काही तरी काय करू शकतो त्याबद्दल विचार करायला हवा कसं करता येईल यावर विचार करायला हवा
★ इथून पुढे सुद्धा फ्रीलान्सर ची गरज भासणार आहे
★ या काळात तुम्ही फॅमिली साठी,मित्रपरिवार यांना वेळ द्या त्यांना व्हिडिओ कॉल करा.तुमच्या बिजनेस मधले कोण तज्ञ असतील त्यांच्याशी चर्चा करा संवाद साधा नेटवर्किंग मध्ये रहा
★ तुमच्या एम्प्लॉय ला काहीतरी रोज नवीन काम, टास्क द्या.
त्यांना पैसे तुम्ही थोड्याफार प्रमाणात द्या
तुम्ही सकाळ-संध्याकाळी कामाचा पडताळणी घ्या,अशाप्रकारे मदत करू शकता. काय काम द्यायचं ते ठरवा
★ नवीन गोष्टी तुम्ही करायला घ्या तुम्ही शिका, तुमच्या कामगारांना शिकवा त्याचा रोज पाठपुरावा घ्या
★ याच काळामध्ये किंवा आर्थिक मंदीच्या काळामध्ये नवीन कंपन्या उदयाला येत असतात उदा. गुगल, फेसबुक, अमेझॉन,अलीबाबा या कंपनी अशा काळात उदयाला आल्या,की त्या काळात त्यांच्याकडे वेळ, पैसा कमी होता.
★ लॉकडाऊनच्या याच काळात तुम्ही तुमच्या गोष्टी, वस्तूचे खरे मार्केटिंग करायला हवे कारण तुमचा प्रतिस्पर्धक हा शांत बसलेला असणार त्यामुळे ही खरी वेळ आहे, जर तुम्ही लोकांच्या लक्षातराहिला तर लोक लॉकडाऊन नंतर तुम्हाला ओळखतील.
★ या काळात कोणत्या वस्तूचा चे उत्पादन करता येईल का ते पहा, कशाप्रकारे करता येईल त्यामागे लागा, यातून लोकांना काम दिले गेले पाहिजे. जास्त कोणत्या वस्तूची मागणी याच्यावरती विचार करा आणि ती वस्तू मार्केटला आणून त्यात वर तुम्ही सेल्स करू शकता
★ त्यानंतर विचार आहे तुमच्या कामगारांचा. तर जुने लोक ठेवून कामाला सुरुवात करा कारण नवीन लोक तुम्ही कसे भरती करणार जे भरती होतील ते जुन्या लोकांसारखे काम करू शकतील का याचा विचार करा, त्यांना हाताशी घेऊन काम करा तर तुमची कंपनी त्यामध्ये व्यवस्थित काम करू शकेल आता त्यांना थोडे पैसे द्या, त्यांना धीर द्या, परिस्थिती समजून सांगा. खात्री करून देते कोण याचाही पगार कापला जाणार नाही तुमच्याकडे कमी भांडवल आहे, व्यवसाय सुरळीत चालू झाला की पगार पण वेळेवर व्यवस्थित होतील असे सांगा
★ तुमचे कार्य करण्याची क्षमता ओळखा, व्यवस्थापन तुम्ही आजच करून ठेवा तुमचे प्लॅनिंग कशी असतील त्यानुसार टीम सोबत कमुनिकेशन करा
★ नियोजन करून ऑटो सिस्टीम तयार करा आणि बिजनेस मध्ये प्रगती करण्यासाठी विचार करा
तुमच्या जुन्या ग्राहकाच्या संपर्कात रहा, आणि नवीन ग्राहक मार्केटिंगकरून तयार करा, तुम्ही एखादीऑफर काढून आज बुकिंग करून ठेवा, त्याचे नियोजन करा, लॉकडाऊन हटले की मग नवीन जोशाने कामाला सुरू करू शकता
★कोणत्या गोष्टी, वस्तू तुम्ही या काळात सेल्स करू शकता का याचा विचार करून काम करा.नवीन कुठल्या गोष्टीचा संशोधन करता येईल का
★ अकाउंट चेक करू शकता यात दर वर्षी तुमचे उत्पादन कधी जास्त झाले, तर कमी कधी झाले ,याचा अभ्यास करू शकता, ज्या काळात जास्त उत्पादन होते,त्यापेक्षा जास्त उत्पादन होण्यासाठीकाय करता येईल याचे नियोजन करा
★ एक चांगला उद्योजक होण्यासाठी काय नवीन शिकण्याची गरज आहे ते पाहून नवीन गोष्टी शिका त्यानुसार एक प्रोसेस आणि सिस्टीम तयार करा
या साठी नेटवर्किंग मध्ये रहा, तज्ञांचे मार्गदर्शन घ्या कारण आता सगळे लोक घरी फ्री आहे
★ तुमच्या ग्राहकांचा एक स्ट्राँग डेटाबेस तयार करूनत ठेवा.
( वरील सर्व माहिती श्री स्नेहल कांबळे यांच्या वेबिनर मधून घेतली आहे, तसेच या लेखातील फोटो देखील सरांच्या वेबिनर मधील आहे.
श्री स्नेहल कांबळे सर हे एक लेखक, संपादक, बिझनेस कोच आणि मोटिव्हेशनल स्पीकर, प्रसिध्द बिझनेस कोच आहेत. )
Comments
Post a Comment