सोशल नेटवर्किंग साईट्सवर जण या मोहजालात अडकताना मैत्रीचं पेव फुटलं आहे. बरेच दिसतात. यामुळे मैत्रीच्या सीमा विस्तारतात आणि विश्व समृद्ध होतं हे खरं असलं, तरी प्रत्येक जण या प्रकारची मैत्री निभावू शकतो असं नाही. कारण या मैत्रीचेही काही नियम आहेत.
रोज एकमेकांना प्रत्यक्ष भेटणारे मित्रही काही पथ्यं पाळतात, त्याचप्रमाणे इथेही काही पथ्यं पाळायलाच हवीत.
आता परेशचं उदाहरण घेऊ. त्याचं कोणाबरोबर तरी भांडण झालं, पण काही काळानंतर परेशला वाईटही वाटलं. आता आपण फेसबुक वर भांडण झालेल्या मित्राशी चॅट करून हा वाद संपवून टाकू, असा विचार त्याने केला. त्याने फेसबुक अकाउंट उघडलं आणि ज्या व्यक्तीशी वाद झाले होते त्या व्यक्तीशी चॅट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्या व्यक्तीने आपलं अकाउंट ब्लॉक करून टाकलं आहे. या गोष्टी परेशला आणखी धक्का बसला. त्यानंतर तो दिवसभर विचार करत बसला. आपल्याला अनु फ्रेंड करण्याचं समोरच्याचं धाडस कसं झालं. अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात सतत येऊ लागले. त्याला संताप आला.
ही भावना त्याच्या मनात इतकी तीव्र झाली की त्याने फेसबुकचं अकाउंट डिलीट करून टाकलं. एकदा त्याच्या घरी फेसबुकवरून चर्चा सुरू होती. फेसबुकवर कोणी तुला त्रास दिलास तर तू काय करतोस असं कोणी तरी परेशला विचारलं. परेशने वेळ न दवडता सांगितलं की ज्याच्याबरोबर माझं जमत नाही त्याला लगेच ब्लॉक करून टाकतो. मला जी गोष्ट आवडत नाही ती ब्लॉक करणं हा माझा अधिकार आहे. समोरच्या व्यक्तीने परेशला विचारलं, एखाद्याला ब्लॉक करणं हा तुला आपला अधिकार वाटत असेल तर एखाद्याने तुला ब्लॉक केलं म्हणून अकाउंट डिलीट करण्याइतका राग तुला का आला? परेशला आता त्याची चूक लक्षात आली. माणसाला त्याचं आयुष्य जगण्याचा, मित्र निवडण्याचा अधिकार आहे हे त्याला जाणवलं. आपण कोणाशीही जबरदस्तीने मैत्री करू शकत नाही.
कोणी आपल्याला ब्लॉक केलं असेल किंवा आपल्याशी बोलणं बंद केलं असेल तर त्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काही नाही. हा आपला अपमान समजता कामा नये. दरवाजाला दोन्ही बाजूंनी कड्या लावता येतात हे आपण विसरतो.
Comments
Post a Comment