Skip to main content

कला शिक्षक प्रशिक्षण अनुभव

 pcmc शिक्षण विभाग आणि आकांक्षा फाऊंडेशन यांचे विद्यमाने आम्ही २७ कला शिक्षकांना दोन दिवसीय कला शिक्षक प्रशिक्षण १३ जून व १४ जून रोजी pcmc शाळा कासारवाडी, पिंपरी, पुणे येथे घेण्यात आले.


 

या दोन दिवसीय कला शिक्षक प्रशिक्षणात कलेचे महत्व आणि केलेचा आपल्या जीवनातील सहभाग अशा अनेक गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. सोबत लहान मुलांकडून आर्ट कसे करून घेयचे हे देखील समजले. 



प्रशासन अधिकारी देखील उपस्थित राहून आमच्या प्रश्नांचे निरसन केले. 



आकांक्षा फाऊंडेशन यांचे काम खूप उत्तम पद्धतीचे आणि मोठे आहे. 


अभिप्राय:

दोन दिवसीय कला शिक्षक प्रशिक्षण खूप उपयुक्त आणि ज्ञानवर्धक होते. या प्रशिक्षणात कला शिकवण्याचे महत्त्व आणि तिचा आपल्या जीवनातील सहभाग याबद्दल अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. विशेषत: लहान मुलांकडून कला कशी करून घ्यावी याबद्दल सखोल माहिती मिळाली. यामुळे मला कला शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यास मदत झाली आणि माझ्या विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे कला शिकवता येईल.

सारांश:

दोन दिवसीय कला शिक्षक प्रशिक्षणात कलेचे महत्त्व आणि जीवनातील सहभाग यासंदर्भात नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. तसेच, लहान मुलांकडून कला कशी करून घ्यावी हे देखील समजले. या प्रशिक्षणाने कला शिक्षणाची पद्धत सुधारण्यासाठी खूप मदत झाली.


Comments

Popular posts from this blog

डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत - पासवर्ड

आजकाल आपले बरेचसे आयुष्य ऑनलाइन जगात व्यतीत होते. आपले बँक खाते, सोशल मीडिया, ईमेल आणि इतर अनेक महत्त्वाचे अकाउंट्स आपण इंटरनेटच्या माध्यमातून वापरतो. या डिजिटल जगात आपली माहिती सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती आपल्या पासवर्डची! कमजोर पासवर्ड तुमच्या अकाउंट्सला हॅकर्ससाठी खुले निमंत्रण देऊ शकतो. म्हणूनच, मजबूत पासवर्ड कसा बनवायचा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचा पासवर्ड तुमच्या डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत आहे. कमजोर पासवर्ड हॅकिंगसाठी आमंत्रण ठरू शकतो. आजच तुमच्या सर्व महत्त्वाच्या खात्यांचे पासवर्ड तपासा आणि त्यांना अधिक मजबूत करा. मजबूत पासवर्ड म्हणजे काय? मजबूत पासवर्ड म्हणजे असा संकेतशब्द जो सहजपणे ओळखता येत नाही किंवा हॅक करता येत नाही. तो अक्षरे, अंक आणि चिन्हे यांचा योग्य मेळ असतो आणि तो वैयक्तिक माहितीवर आधारित नसतो. मजबूत पासवर्ड बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स: लांबी महत्त्वाची: तुमचा पासवर्ड शक्यतो किमान ८ अक्षरांपेक्षा जास्त लांबीचा असावा. जास्त लांब पासवर्ड क्रॅक करणे अधिक कठीण असते. अक्षरांचे मिश्रण: पासवर्ड...

मनाचे आरोग्य असे जपा

मनाचे आरोग्य असे जपा मनाचे आरोग्य म्हणजे आपण भावनिक आणि मानसिकदृष्ट्या किती चांगले आहोत. हे आपल्या विचारांवर, भावनांवर आणि वर्तनावर परिणाम करते. चांगल्या मानसिक आरोग्यासह, आपण जीवनातील आव्हानांना तोंड देऊ शकतो आणि आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगू शकतो. 1 स्वयं संवाद मनाचं आरोग्य म्हटल की प्रश्न येतो तो मन कुठं असतं? त्याच्यावर उपचार ते कसे करायचे ? काय करायचे? खरं तरं मनाचं आरोग्य छान राखणं खूपच सोपं आहे, त्यासाठी आवश्यक असतो तो संवाद. अखंड संवाद, तोही स्वतःशी, स्वयं संवाद, म्हणूया त्याला. विचार करू लागलो की कळतं आपण स्वतःशीच संवाद साधत नाही. यश मिळालं तर माझं कर्तृत्व, अपयश आलं तर परिस्थिती दोषी ! असं कसं चालेल? चुकांसाठी अन्य कोणालाही जबाबदार धरताना स्वतःशी बोला.. इतरांशी खोटं बोलता ठीक आहे, स्वतःशी तरी खरं बोला म्हणजे अपयशावर यश कसं मिळवायचं, कसं मिळतं हे तुम्हाला सहज समजू लागेल. 2 मूळ शोधा तणाव, मनस्ताप, संताप या प्रतिक्रिया झाल्या मग प्रश्न येतो की क्रिया सुरू कोठे होते. मूळ कोठे आहे? व्यक्तीत? परिस्थितीत? थोडं अंतरंगात डोकावलं की कळतं की या सर्वाचं मूळ आपल्या मध्येच सापडतं. ते साप...

नवीन स्मार्टफोन खरेदीसाठी मार्गदर्शक टिप्स जाणून घ्या

 आज आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच वेळा आपण काही गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपल्याला भविष्यात त्रास होऊ शकतो किंवा आर्थिक नुकसानही होऊ शकतं. म्हणूनच, स्मार्टफोन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी आणि कधी खरेदी करावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. बाजारात स्मार्टफोन घेण्यासाठी गेल्यावर काही गोष्टींची काळजी घेतल्यास भविष्यात होणारे नुकसान टाळता येते. अनेकदा स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टींची व्यवस्थित तपासणी करणे गरजेचे असते, कारण त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून, स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची माहिती असावी आणि तो कधी खरेदी करावा, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. आजच्या डिजिटल जगात स्मार्टफोन फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही, तर तो आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. फोटो काढणे, बँकेचे व्यवहार करणे, सोशल मीडियावर कनेक्टेड राहणे, ऑफिसचे काम करणे आणि मनोरंजन करणे हे सर्व काही आता एकाच डिव्हाइसमध्ये शक्य झाले आहे. यावरून स्मार्ट...