मनाचे आरोग्य असे जपा
1 स्वयं संवाद
मनाचं आरोग्य म्हटल की प्रश्न येतो तो मन कुठं असतं? त्याच्यावर उपचार ते कसे करायचे ? काय करायचे? खरं तरं मनाचं आरोग्य छान राखणं खूपच सोपं आहे, त्यासाठी आवश्यक असतो तो संवाद. अखंड संवाद, तोही स्वतःशी, स्वयं संवाद, म्हणूया त्याला. विचार करू लागलो की कळतं आपण स्वतःशीच संवाद साधत नाही. यश मिळालं तर माझं कर्तृत्व, अपयश आलं तर परिस्थिती दोषी ! असं कसं चालेल? चुकांसाठी अन्य कोणालाही जबाबदार धरताना स्वतःशी बोला.. इतरांशी खोटं बोलता ठीक आहे, स्वतःशी तरी खरं बोला म्हणजे अपयशावर यश कसं मिळवायचं, कसं मिळतं हे तुम्हाला सहज समजू लागेल.
2 मूळ शोधा
तणाव, मनस्ताप, संताप या प्रतिक्रिया झाल्या मग प्रश्न येतो की क्रिया सुरू कोठे होते. मूळ कोठे आहे? व्यक्तीत? परिस्थितीत? थोडं अंतरंगात डोकावलं की कळतं की या सर्वाचं मूळ आपल्या मध्येच सापडतं. ते सापडलं की संताप, मनस्ताप क्षणात संपून जातो. एखादा माणूस तुम्हाला आवडतो किंवा एखादा आवडत ही नाही. का आवडत नाही? तर तो तुमच्या स्वार्थाचा (हिताचा) विचार करीत नाही. आता हेच पाहा, त्यानं तुम्हाला शिव्या दिल्या की तुम्ही संतापता, तुमचा त्रास तिथेच सुरू होतो, कारण त्यानं दिलेल्या शिव्या तुम्ही स्वीकारलेल्या असतात.समजा, त्या न स्वीकारता सोडून दिल्या तर? संतापाला जागा राहतेच कोठे? शिव्या देणारा फार तर अस्वस्थ होईल? पण तुम्ही शांत असाल तर त्यालाही शांतताच मिळेल.
3 मातृ देवो भव
तुम्हाला प्रमेश्वराचं दर्शन घ्यायचंय ? त्यासाठी यात्रेला जायला नको की मंदिरात. त्याचं अस्तित्व आहे ते आपल्याच घरात. आई वडिलांकडे पहा. त्यांच्यामुळेच आज मी जो आहे तो आहे परमेश्वराने पूजा करण्यासाठी जिवंत देव दिला तो म्हणजे आई वडील. त्यांना रोज नमस्कार करा, त्याचे आशीर्वाद घ्या. त्यांची सेवा करा. जीवनात तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही.
4 आनंद वाढवा
दुःख वाटल्यानं कमी होत अन आनंद वाटल्यानं तो वाढतो असं म्हणतात खर, पण खरंच तस होत का? बऱ्याच वेळा आनंदात आनंद न वाटता असू या वाटली जाते, मत्सर वाटला जातो आता असं पहा. एखादया मोठ्या विवाह समारंभाला तुम्ही गेलात आनंदाचा प्रसंग. सुग्रास भोजनाचा आणि आनंद वाढविण्याचा प्रसंग. पण होत असं की भोजनाचा स्टॉलवर उभे असताना यजमानाच्या या डामडौलावर टीका सुरू होते काही मंडळी नवरा मुलगा किंवा मुलगी यांच्या चारित्र्यावर बोलू लागता तर काही भ्रष्टाचारावर.. असं असेल तर आनंदा वाढेल कसा? त्यामुळे एक करा, ज्या ठिकाणी जायचं-त्या ठिकाणी किमान आपल्याकडून आनंदात मीठ कालविले जाणार नाही याची काळजी घ्या. इतरांच्या आनंदात मनापासून सहभागी व्हा - तो वाढल्याशिवाय राहणार नाही.
5 सेवेतला आनंद
रस्त्यांवरच्या गर्दीत अचानक काही तरी झालं. धावपळ सुरु झाली. त्यात एक अंध व्यक्ती गोंधळलेल्या अवस्थेत उभी होती. काय करावं? कुठे जावं ? पळावं की थांबावं ! काही कळत नव्हतं तिला. कोणी तरी आधार द्यावा त्या व्यक्तीला कोणीतरी पाहील तिच्याकडे असं वाटतं मला, पण माझ्यातला 'मी मात्र मदतीसाठी झेपावत नव्हता. स्वतःला वाचविण्यात कौतुक ते काय ? त्या व्यक्तीला आधार दिला तर? सेवेच्या संधी क्वचितच मिळतात. घेऊन पहा अन् मग मन शांत होणं म्हणजे काय असतं याचा अनुभव येईल तुम्हाला. तुमच्या पाप-पुण्याच्या हिशेबात सेवा पाप नाशकाचं काम करते हेही लक्षात घ्या. आणि मग माणूस झाल्यासारखं वाटलं तुम्हाला!
6 वर्तमानात रहा.
काहीही केलं तरी मन एकाग्र होत नाही. अभ्यासाला बसलं की कुठल्या तरी कामाची आठवण होते किंवा एखादया आठवणीत मन रेंगाळत, काही वेळा दुःखी होतं. अभ्यास राहतो बाजूला, किती प्रयत्न केले एकांतात बसलो, वेळापत्रक केलं. चहा घेतला, गुटखा खाल्ला किंवा सिगारेट ओढली तरी एकाग्रता नाहीच, काय करावं? खरं तर काहीच करावं लागत नाही. आता जो करायचं आहे तेवढंच करावं. वास्तवातला क्षण उपभोगावा. उद्याची चिंता किंवा कालच्या आठवणी किंवा तासा भरांनंतरचं जेवण त्या वेळी करा. आता अभ्यास करीत असाल तर तोच करा. आता खेळत असाल तर फक्त खेळा. टिळी पाहात असाल तर फक्त टिव्ही पाहा, जेऊ नका. एका वेळी एकच गोष्ट मनमोकळी अनु आनंदानं करा मजा येईल. - प्रारंभी कठीण वाटेल. पण सोप आहे ते Be in present.
7 प्रतिमा संवाद थांबवा
माणूस संवाद करतो म्हणजे काय करतो? बऱ्याच वेळा त्याच्या प्रतिमेशीच तो संवाद असतो. हा माणूस खडूस आहे. तो अति शहाणा आहे. तो भित्रा आहे किंवा त्याला अक्कल नाही. आपल्या मनातल्या प्रतिमाशी आपण बोलत असतो त्याचा परिणामही सरळ आहे. खडूस माणूस खडूस आहे म्हणून संवाद साधला तर तो खडूस पणांचाच अनुभव देतो. एक प्रयोग करून पाहा. खडूस माणसाशी ही अगदी मनापासून चांगला वाला चांगलं बोला. त्याच कौतुक करा किंवा वेगळ्या शब्दांत सांगायचं तर तो जसा आहे तसा त्याचा स्वीकार करा पाहा हा माणूस खडूब होता का? आपण उगाचच भ्रम करून घेतला, असं तुम्हाला काटायला लागेल. तुमच्या बाबतीतही हाप्रयोग शंगर / मशासी होईल.
- आपले मन आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे.
- आपल्या मनाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
- चांगल्या मानसिक आरोग्यासह, आपण आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगू शकतो.
लेखक: किशोर कुलकर्णी
संदर्भ : सदर माहिती इंटरनेट, गुगल जेमिनीमधून घेण्यात आली असून सर्व फोटो हे freepik या वेबसाईट वरून वापरले आहे. माहितीमध्ये काही बदल असू शकतो. लेखक, प्रकाशक या लेखातील माहितीशी सहमत असतील असे नाही.
Comments
Post a Comment