मनाचे आरोग्य असे जपा मनाचे आरोग्य म्हणजे आपण भावनिक आणि मानसिकदृष्ट्या किती चांगले आहोत. हे आपल्या विचारांवर, भावनांवर आणि वर्तनावर परिणाम करते. चांगल्या मानसिक आरोग्यासह, आपण जीवनातील आव्हानांना तोंड देऊ शकतो आणि आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगू शकतो. 1 स्वयं संवाद मनाचं आरोग्य म्हटल की प्रश्न येतो तो मन कुठं असतं? त्याच्यावर उपचार ते कसे करायचे ? काय करायचे? खरं तरं मनाचं आरोग्य छान राखणं खूपच सोपं आहे, त्यासाठी आवश्यक असतो तो संवाद. अखंड संवाद, तोही स्वतःशी, स्वयं संवाद, म्हणूया त्याला. विचार करू लागलो की कळतं आपण स्वतःशीच संवाद साधत नाही. यश मिळालं तर माझं कर्तृत्व, अपयश आलं तर परिस्थिती दोषी ! असं कसं चालेल? चुकांसाठी अन्य कोणालाही जबाबदार धरताना स्वतःशी बोला.. इतरांशी खोटं बोलता ठीक आहे, स्वतःशी तरी खरं बोला म्हणजे अपयशावर यश कसं मिळवायचं, कसं मिळतं हे तुम्हाला सहज समजू लागेल. 2 मूळ शोधा तणाव, मनस्ताप, संताप या प्रतिक्रिया झाल्या मग प्रश्न येतो की क्रिया सुरू कोठे होते. मूळ कोठे आहे? व्यक्तीत? परिस्थितीत? थोडं अंतरंगात डोकावलं की कळतं की या सर्वाचं मूळ आपल्या मध्येच सापडतं. ते साप...
Vikas Agawane is a Artist and Graphics Designer. With good painting he turned to graphics design and is working as an excellent designer.