Skip to main content

किशोरवयीन विचार म्हणजे काय?



दुसऱ्यासाठी जगणे यातच खरे जगणे आहे. माणसाने आयुष्यामध्ये कोणातरीसाठी जगावे. 

प्रत्येक वेळी देव आपली काळजी करत असतो. तो देव आपल्या कामात प्रत्येक क्षणाला धावून येत असतो फक्त ते आपण ओळखले पाहिजे सतत देवाचे नामस्मरण केले पाहिजे, जे आपण हिंदी, मराठी गाणी म्हणतो, त्यापेक्षा देवाचे नामस्मरण केले पाहिजे.गाणी म्हणणे हे माणसाला आवडते पण देवाचे नाव घेयचे म्हटले की लाज वाटते. ही आजच्या माणसाची परिस्थिती आहे.

माणसाने ओळखले पाहिजे की आपल्याला ही शिक्षा मिळाली आहे की ते चांगल्यासाठी होते आहे जर शिक्षा असेल तर आपण काय केले तेव्हा आपणाला शिक्षा भेटली मिळाली आहे कोणतेही गोष्ट होती ती चांगल्यासाठीच. पण ज्याचे आधी चांगले होत त्यांचे नंतर वाईट होते पण ज्याचे आधी वाईट होत त्याचे नंतर चांगले होते.

गुरु कोणाला म्हणावे जो आपणाला घडवतो चांगले शिकवतो चार गोष्टी समजावून सांगतो त्याला गुरू म्हणावे गुरुच्या अनेक व्याख्या आहेत. 

माणसाने प्रत्येक गोष्टीवर विचार करावा चांगले काय, वाईट काय हे माणसाला कळले पाहिजे कोणतीही गोष्ट दुकानातून घेताना बारकाईने पहावी दुसरे म्हणजेती गोष्ट किंवा वस्तू किंवा पदार्थ याचा शेवट चांगला आहे की नाही हे पहावे.उदा. आपण मोबाईल घेतला तर त्याचा शेवट काय होईल, तो आपण टाकून देईल का काही दिवसांनी तो विकेल, त्याचा शेवट चांगला झाला तरच ती वस्तू घ्यावी. व्यक्तीने मनाने प्रत्येक गोष्टीत सुखी असले पाहिजे घर, धन, दौलत, पैसा याने नव्हे. हे सर्व सुख देत नाही. तर दुःख देते. मनानी सुखी असलेला माणूस खराच सुखी असतो.

देव हा प्रत्येकाच्या मनात, हृदयात आहे तेव्हा माणसाने दुसऱ्यासंगे नीट वागावे, बोलावे. जर दुःखाने रागाने बोलला, वागला तर तो माणूस आपल्यावर नाराज होतो त्याचाच अर्थ असा की, आपण देवा- बरोबर तसे वागलो देवाला बोललो म्हणजेच पाप केले. 

प्रत्येक माणसाने प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने वागावे. जेणेकरून आपणाकडून त्याला त्रास होणार नाही, तो आपणावर रागावणार नाही, त्याचा आपल्यावरचा विश्वास उडणार नाही.तो दुःखी होणार नाही. 

माणसाने मैत्री जपावी. व आपणाला संकट काळी ज्या व्यक्तीने मदत केली आहे त्याची आठवण ठेवावी व ज्याने आपल्याला घडवले त्याची सुद्धा, 

माणसाने प्रत्येक माणसाला मदत करावी. पण त्याला खरीच गरज आहे ते पहावे नाहीतर एक भिकारी आला तुम्हाला पैसे मागितले आणि तुम्ही ते दिले. आणि तो पुढच्या च हॉटेलमध्ये जावून जेवला तर ते बरे नव्हे. तेव्हा ज्याला खरी गरज आहे.त्याला मदत करावी. जर तुमच्या दारात एखादी चांगली धष्ट-पुष्ट असलेली व्यक्ती मागायला आली. तर तुम्ही त्याला द्यावे की नाही ते पहावे. जर तुम्हाला त्या माणसाला मदत करावयाची आहे तर त्याला थोडे काम क्या. कचरा उचलणे, गवत काढणे. आणि नंतर त्या कामाबद्दल त्याला मोबदला घ्यावा. माणसाने नीट व्यवस्थीत रहावे. 

दुसऱ्याने जरी आपणाकडे बघितले तरी आपण फ्रेश दिसलो पाहिजे अंगात आळस, मरगळ नको- कपडे व्यवस्थित असावेत. 

माणसाने प्रत्येक कामात लक्ष द्यावे.त्या कामावर पुर्णपणे लक्ष असावे, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता ते काम मनापासून, प्रामाणीकपणे, आपले म्हणून करावे, नूसते कर म्हणून करू नये, तर ते नीट केले तर त्यातून आपणाला अधिक माहिती मिळते. आयुष्यामध्ये माणसाने वेळेच्या वेळी काम करावे. जर वेळ निघून गेली तर तुम्ही नंतर काम केले. तर त्या कामाला अर्थ नाही एकाच वेळी एकच काम करावे.

दुसऱ्याशी बोलताना नीट, काळजीपूर्वक बोलावे (शुद्धमराठी.) व्यक्तीने मोचकेच बोलावे, कमी आवाजात, कामापुरतेच. जास्त फालतुक बडबड नको आपणाला जेवढे लागले तेवढेच माणसाने ध्याने जास्त घेवू नये. दुसऱ्याचे जर आपणाला बरे वाटू लागले की आपणाला बरे वाटेल.

जर तुम्हाला दुसऱ्याचे घर, प्रत्येक वस्तू जर आवडत असेल तर ती घेवू नका. प्रत्येक ठिकाणी जाताना परवानगी काढा. वस्तु घेताना सुध्दा.

जर माणसाला वेळ असेल तर देवाचे नामस्मरण करा. 

प्रत्येक माणसाने आपणाला असे कामात गुतंवून घ्या की जेणे करून आपणाला दुस-याचे वाईट दिसणार नाही. दुसऱ्याची स्तुती, निंदा करू नये. 

प्रत्येक गोष्टीत चुका काढू नये. जर तुमच्या आईने तुमच्या नावडतीची भाजी केली तर तुम्ही ती नक्की खा. आणि नंतर आईला म्हणा, भाजी चांगली झाली होती. जेणे करून आपल्या आईला आपल्याविषयी प्रेम वाटले पाहिजे.

मनात विचार आणा व चांगले विचार, लगेच कृतीत आणा. 

आपणाला लागेल तेवढेच घ्या. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आहे. जास्त काही घेवू नका, तुम्ही कधीही घरात कोणाच्याही बघा घर असते. छोटेसे घरात कपाट, टीव्ही, बेड दिवान, खाट, टेबल, फ्रिज असतो पण तोच माणूस रात्रीचा घरात झोपताना कुत्र्या- सारखा झोपतो म्हणजे बघा काय माणस असतात. निर्जीव वस्तूना मात्र घरात जागा देतात पण सजीवांना मात्र जागा नाही. कशाला हो पाहिजे ऐवढे सगळ माणसाला, मूलभूत गरजा भागल्या की जीवन जगता येते.

माणसाचे चारित्र्य खराब असले की, शेवटपर्यंत खराबच असते. जर एखादी व्यक्ति सतत खोटे बोलत असेल आणि एखाद‌या वेळी ती व्यक्ती खरे बोलले तरी लोक (समाज) ते खोटेच म्हणणार कारण ती व्यक्ती सतत खोटे बोलत असते.

मूलांवर घरातील आई-वडिल यांचे संस्कार चांगले पाहिजे जर संस्कार चांगले असले तर त्या मुलाचे चारित्र्य चांगले असते. घरातल्यांनी निट वागाले तरच आपली मुलें चांगल वागतात जर एखादया मुलाचे वडील दारू सेवन करीत असेल तर मुलगा सुद्धा मोठा झाल्यावर दारूच पितो.माणसाने लक्षात ठेवावे की मोठ्या माणसांच अनुकरण लहान मुलगा करत असतो. आई-वडिलांना कसले ही व्यसन नसावे. 

प्रत्येक कामात गोडी निर्माण झाली पाहिजे. कामावर त्या व्यक्तीचे / माणसाचे कर्तृत्व व तो श्रेष्ठ ठरतो. घरामध्ये आईला महत्व विद्यार्थ्यांनी दिले पाहिजे. आईने आपल्याला सर्व शिकवले. तेव्हा आपल्या आयुष्यातील पहिला गुरू आईच. संसाराची गाडी चांगली पाहिजे. महत्वाचे म्हणजे गाडीची चाके दोन चांगली पाहिजे १ म्हणजे आई, व दुसरे म्हणजे वडील. 

तुम्ही जे पेराल तेच उगवते. माणसाने नेहमी खरे/ सत्य बोलावे ते शेवटपर्यंत खरेच टिकते. तुम्ही तुमच्या आई-वडिलांपासून खोटं लपवल तरी ते कधीना कधी उघड होतच. जर तुम्ही फसवल तर तुम्ही म्हणता की कसे काय फसवलं" इ उदा. आई- वडिल शिक्षक, एखादी व्यक्ती इ. फसवलं पण त्यावेळी तुम्हीच फसलेला असता. तुम्हीच तुमच्या पायावर धोंडा पाडून घेता. 

आयुष्यात कितीतरी वेळा आपण दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे. पण आपल्याला त्याची जाणीवच नसते. दुसऱ्याविषयी मत बनवताना किंवा वाईट बोलताना आपण सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय का ? कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात. (दिसतं तसं नसते...) 

जीवनात परत न येणाऱ्या पाच गोष्टी :- 

1.दगड 

2. बोललेला शब्द 

3. निघून गेलेली संधी 

4.निघून गेलेली वेळ

5. प्रेम. 


माणूस हा रडतो त्यामध्ये रडण्याचे 2 प्रकार असतात. 

एक म्हणजे दुःखाचे अश्रू, दूसरे म्हणजे सुखाचे अश्रू असते. माणूस किंवा स्त्री सतत बाराही महिने म्हणतो माझे हे दुखते ते दुखते पण त्यातील काही दुखणे हे देखील चांगल्यासाठीन्च दुखत असते. ते दुखल्यानंतर कोणतेतरी चांगले कार्य घडते. 

प्रत्येक काम हृद‌यातून, मनाने करावे. मारलेली हाक आईला हृद‌यातून मारावी तेव्हा व्यक्ती / विद्यार्थी/माणूस याला आनंद मिळतो. 

म्हटलेले गाणे हृदयातून म्हणावे. गाणी आजकालची वरवरची आहे. 

देव हा माणसाला प्रत्येक वस्तू/ गोष्टी देताना चांगली किंवा वाईट देतो ते आपण स्वीकारताना चांगली वस्तू / गोष्ट स्वीकारावी. वाईट नाही. त्यामध्ये चांगले काय व वाईट काय हे समजले पाहिजे उदा. आपणाला डोळे आहे आपण रस्त्याने चालताना सर्वत्र पाहतो. पण एका बाजूला एक व्यक्ती शौचासाठी बसली. आहे. व पुढेच चालत गेलात तर एका मंदिरात देवाचे नामस्मरण चालू आहे आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या. पण चांगले तेच घ्यावे. वाईट ते सोडून द्यावे. माणूस किंवा जग हे स्वार्थ्यामागे लागले आहे. प्रत्येक जण मला, मला, मला म्हणून जगत असतो. दुसन्यासाठी ही जगून बघा.

माणसाचा विचार बदलला की त्याचे पुढील जीवन बदलते. जर माणसाचा विचार नकारात्मक असेल तर जीवन नकारात्मक  बदलते, जर विचार सकारात्मक असेल तर बदलते. जर जीवन सकारात्मक बदलते. म्हणून विचार नेहमी सकारात्मक असावा.

कोणाचाही सुड घेवू नये. शांत रहावे सर्व काही ठीक होते.

जेवढे आयुष्य तुम्ही जगणार आहे. तेवढेच जगा, जास्त मी जगावे अशी हाव करू नका. तेवढेच ज‌गा पण चांगले जगा. तिकट खाऊ नये त्या व्यक्तीला रागफार येतो. जगण्यासाठी खावा, खाण्यासाठी जगू नका.

------------------------------------------------------------------

टीप: हे विचार जसे आले तसे लिहले आहे. यामध्ये काही बदल असू शकतात. 

संदर्भ :  गुगल आणि फ्रीपीक मधून फोटो वापरले आहे. 

Comments

Popular posts from this blog

नवीन वर्ष, नवीन सुरुवात: टू-डू लिस्ट आणि जर्नल लेखन

नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात. आपले ध्येय गाठण्यासाठी आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. यासाठी टू-डू लिस्ट आणि जर्नल लेखन हे दोन खूप प्रभावी साधन आहेत. टू-डू लिस्ट: ही एक अशी यादी आहे ज्यामध्ये आपण आपले सर्व काम , प्रोजेक्ट्स आणि ध्येय लिहून ठेवतो. ही यादी आपल्याला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास आणि आपले वेळ व्यवस्थापन सुधारण्यास मदत करते. जर्नल लेखन: जर्नल लेखन म्हणजे आपल्या विचारां , भावना आणि अनुभवांना शब्द देणे. हे आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि आपल्या मानसिक आरोग्याला सुधारण्यास मदत करते.   टू-डू लिस्टसाठी टिपा: दिवसाच्या सुरुवातीला यादी तपासा. छोटे (शॉर्ट टर्म) व दीर्घकालीन (लाँग टर्म) उद्दिष्टांची यादी. रोजच्या महत्त्वाच्या गोष्टींची टू-डू लिस्ट. प्रत्येक कामाचे वर्णन स्पष्ट आणि संक्षिप्त असावे. सर्वात महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या आणि त्यांना वरच्या बाजूला लिहा. आपण जे काम करू शकतो तेच काम यादीत समाविष्ट करा. पूर्ण झालेली कामे काढून टाका आणि नवीन कामे यादीत जोडा. पूर्ण झालेल्या कामांवर चेकमार्क करा ( ✅...

डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत - पासवर्ड

आजकाल आपले बरेचसे आयुष्य ऑनलाइन जगात व्यतीत होते. आपले बँक खाते, सोशल मीडिया, ईमेल आणि इतर अनेक महत्त्वाचे अकाउंट्स आपण इंटरनेटच्या माध्यमातून वापरतो. या डिजिटल जगात आपली माहिती सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती आपल्या पासवर्डची! कमजोर पासवर्ड तुमच्या अकाउंट्सला हॅकर्ससाठी खुले निमंत्रण देऊ शकतो. म्हणूनच, मजबूत पासवर्ड कसा बनवायचा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचा पासवर्ड तुमच्या डिजिटल जीवनाची पहिली सुरक्षा भिंत आहे. कमजोर पासवर्ड हॅकिंगसाठी आमंत्रण ठरू शकतो. आजच तुमच्या सर्व महत्त्वाच्या खात्यांचे पासवर्ड तपासा आणि त्यांना अधिक मजबूत करा. मजबूत पासवर्ड म्हणजे काय? मजबूत पासवर्ड म्हणजे असा संकेतशब्द जो सहजपणे ओळखता येत नाही किंवा हॅक करता येत नाही. तो अक्षरे, अंक आणि चिन्हे यांचा योग्य मेळ असतो आणि तो वैयक्तिक माहितीवर आधारित नसतो. मजबूत पासवर्ड बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स: लांबी महत्त्वाची: तुमचा पासवर्ड शक्यतो किमान ८ अक्षरांपेक्षा जास्त लांबीचा असावा. जास्त लांब पासवर्ड क्रॅक करणे अधिक कठीण असते. अक्षरांचे मिश्रण: पासवर्ड...

नवीन स्मार्टफोन खरेदीसाठी मार्गदर्शक टिप्स जाणून घ्या

 आज आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच वेळा आपण काही गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपल्याला भविष्यात त्रास होऊ शकतो किंवा आर्थिक नुकसानही होऊ शकतं. म्हणूनच, स्मार्टफोन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी आणि कधी खरेदी करावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. बाजारात स्मार्टफोन घेण्यासाठी गेल्यावर काही गोष्टींची काळजी घेतल्यास भविष्यात होणारे नुकसान टाळता येते. अनेकदा स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टींची व्यवस्थित तपासणी करणे गरजेचे असते, कारण त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून, स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची माहिती असावी आणि तो कधी खरेदी करावा, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. आजच्या डिजिटल जगात स्मार्टफोन फक्त बोलण्यापुरते मर्यादित नाही, तर तो आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. फोटो काढणे, बँकेचे व्यवहार करणे, सोशल मीडियावर कनेक्टेड राहणे, ऑफिसचे काम करणे आणि मनोरंजन करणे हे सर्व काही आता एकाच डिव्हाइसमध्ये शक्य झाले आहे. यावरून स्मार्ट...